Sunday, 07 Jun, 3.05 pm प्रभात

मुखपृष्ठ
कोपरगाव तालुक्याला करोनाचा पुन्हा धक्का!

कोपरगाव (प्रतिनिधी) - गेल्या दोन महिन्यापासून करोना मुक्त असलेल्या कोपरगाव तालुक्याला तिन दिवसात दुसरा करोना बाधीत धक्क बसल्याने सुरक्षीत कोपरगाव असुरक्षित दिसु लागला आहे. तालुक्यातील धोत्रे येथील एका १४ वर्षाच्या मुलीला करोनाची बाधा झाल्याची माहीती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी दिली.

गेल्या आठवड्यात मुंबई ठाणे येथुन दोन मुलींना त्यांचे आजोबा कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे घेऊन आले होते. संबधीत मुलींचे वडील करोना बाधीत असल्याची माहिती उघड झाल्यानंतर आलेल्या दोन मुली व आजोबा या तिघांना शहरातील करोना केअर सेंटर मध्ये इनस्टिटयुशनल क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यापैका एका १४ वर्षाच्या मुलीचा वैद्यकीय अहवाल करोना बाधीत आढून आल्याने कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. त्यामुळे बाधीत मुलगी राहात असलेले धोत्रे गाव व परिसर सिल करण्यात आला आहे. ठाणे येथून आल्या बरोबर बाधीत मुलीसह तिघांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवल्याने यांच्या संपर्कात कोणी आले नाहीत ही बाब समाधान कारक आहे.

कोपरगाव तालुक्यातील नागरीकांना करोना संसर्गजन्य आजाराची लाग होणार नाही विषेश खबरदारी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे, डॉ.वैशाली बडदे आढाव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांच्यासह पोलीस, पालीका, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक व सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

दरम्यान शहरातील करोनाबाधीत महीला डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना करोनाची बाधा नसल्याचा अहवाल वैद्यकिय विभागाकडे आल्याने कोपरगाव तालुक्याची चिंता कमी झाली आहे.

शहरातील डॉक्टर महीलेच्या मामाला करोनाची बाधा होताच स्वतःहोवून एका खाजगी वैद्यकीय प्रयोग शाळेत आपल्या घश्याच्या स्त्रावच्या नमुन्यांची तपासणी करून घेत एक जागृत डॉक्टरची भूमीका पार पाडली तसेच, तपासणी अहवाल येण्याच्या आगोदरच स्वतःपासुन आपल्या मुलांना व कुटुंबातील सदस्यांना लाब ठेवून संसर्ग होणार नाही याची दक्षता बाधीत महीला डॉक्टरने घेतल्याने त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व व्यक्तींचा वैद्यकीय अहवाल करोना निगेटीव आला आहे. एखाद्या बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आल्याचा साधा संशय आला तरी कशी काळजी घ्यावी हेच या बाधीत महीला डॉक्टर च्या कृतीतुन सिद्ध होते.

कोपरगाव तालुक्यात आत्तापर्यंत करोना बाधीतांची संख्या तिन झाली असून, त्या पैकी एका ५५ वर्षीय महीलेचा एप्रिल मध्ये उपचारा दरम्यान मृत्यु झाला. बाधीत मुलगी व महीला डॉक्टरवर कोपरगाव येथे उपचार सुरू आहे. तर सारी संसर्गजन्य आजाराने शिंगणापुर व संवत्सर मनाई वस्ती येथील महीलांचा काही दिवसापुर्वी मृत्यु झाला आहे. हा अपवाद वगळता कोपरगाव तालुका करोना मुक्त होता. परंतु लोणीवरुन आलेला मामा व ठाण्यातील वडिलांमुळे भाची मुलगी करोना बाधीत निघाल्याने पुन्हा कोपरगाव तालुकःयाला करोनाची बाधा झाली आहे. बाधीत रुग्णांच्या संपर्कातील नागरीकांची तपासणी व शोधमोहीत प्रशासनाच्या वतीने सुरु आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>