Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे उघडले; 6,129 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे उघडले; 6,129 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

Koyna Dam : कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज, दि. ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूटाने उघडून ५,०७९ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

तसेच कोयना धरण (Koyna Dam) पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ६,१२९ क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो.

धरणातून (Koyna Dam) सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळपर्यंत कोयना धरणात ८४. ७७ टीएमसी पाणीसाठा झाला असून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात आहे सध्या धरण ८०.५४ टक्के भरले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat