menu
प्रभातमुखपृष्ठ

लक्ष्मण रानवडे यांना "डॉ. आंबेडकर समाज उत्थान' पुरस्कार

26 May 2017, 4:22 am

पिंपरी,  (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे  लक्ष्मण रानवडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्थान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हा सोहळा नुकताच कोल्हापूर येथे पार पडला. रानवडे यांना सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, सामाजिक विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 25 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक, असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

लक्ष्मण रानवडे हे गेली 35 वर्षे समाजातील दुर्बल व्यक्तींना मदत करत आहेत.

Loading...

No Internet connection

Link Copied