Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Lakshmi Yojana: 'लक्ष्मी योजने'च्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ; महिलांना दरमहा मिळणार २,५०० रुपयांची मदत

Lakshmi Yojana: 'लक्ष्मी योजने'च्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ; महिलांना दरमहा मिळणार २,५०० रुपयांची मदत

प्रभात 2 weeks ago

Lakshmi Yojana: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शनिवारी दिल्ली लक्ष्मी योजनेसाठी अधिकृत ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ केला. या योजनेंतर्गत शहरातील पात्र महिलांना दरमहा २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

जनतेला संबोधित करताना रेखा गुप्ता म्हणाल्या, दिल्ली लक्ष्मी योजना ही दिल्लीतील भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना आहे. यासाठी सरकारने ५,१०० कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे.

आजपासून या योजनेचे पोर्टल सुरू झाले असून नोंदणी प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. मला वाटते की पहिल्याच दिवशी जवळपास ५०० महिलांनी यशस्वीरीत्या आपले अर्ज भरले आहेत.गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या योजनेचे प्रमुख आश्वासन दिले होते. मंगळवारी मुख्यमंत्री गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली होती.

योजनेचे स्वरूप आणि आर्थिक रचना
एकूण मदत: दरमहा २,५०० रुपये
प्रत्यक्ष मिळणारी रक्कम: दरमहा १,००० रुपये (हातात मिळणारी रक्कम)
मुदत ठेव : उरलेले १,५०० रुपये हे ३ वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवले जातील.
बजेट तरतूद: या योजनेसाठी दिल्ली सरकारने ५,१०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

कोणाला मिळणार लाभ?
या योजनेसाठी अर्ज करणारी महिला 21 ते 60 वर्षे वयोगटातील असावी. संबंधित महिला किंवा तिचे कुटुंब किमान 10 वर्षांपासून दिल्लीचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. एका कुटुंबातील फक्त एका महिलेलाच या योजनेचा लाभ मिळेल.

Amit Thackeray Speech: "…मी परत येतो"; भरसभेत अमित ठाकरे भाषणच विसरले

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat