Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Loni Kalbhor Crime : बेपत्ता अल्पवयीन मुलाचा शोध! मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य आरोपी अटकेत

Loni Kalbhor Crime : बेपत्ता अल्पवयीन मुलाचा शोध! मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य आरोपी अटकेत

प्रभात 4 months ago

Loni Kalbhor Crime - नायगाव फाटा येथून बेपत्ता झालेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा अखेर लोणी काळभोर पोलिसांनी शोध लावून त्याला सुखरूप उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून, बेपत्ता होण्यापूर्वी संबंधित मुलाला थेऊर फाटा परिसरातील एका हार्डवेअर दुकानात अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

हार्डवेअर चालकासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. पियुष संदीप शिंदे (वय 16 वर्षे 10 महिने) असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव असून, रणजित कालुसिंग रावणा राजपूत (वय 28, रा. महादेव ट्रेडर्स, थेऊर फाटा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याशिवाय एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पियुषची आई मनिषा संदीप शिंदे (रा. नायगाव फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पियुष हा मागील सहा दिवसांपासून बेपत्ता होता. त्याच्या अपहरणाची तक्रार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान, थेऊर फाटा परिसरातील महादेव ट्रेडर्स या हार्डवेअर दुकानात त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला.

या व्हिडिओमध्ये पियुषला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी बांबूने मारहाण केली जात असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने संतापाची लाट उसळली होती. पोलीस हवालदार निलेश कोल्हे आणि पोलीस अंमलदार सचिन सोनवणे यांनी पियुषचा शोध सुरू केला. कुंजीरवाडी परिसरातील एका ट्रक पार्किंगमध्ये पियुष आढळून आला. चौकशीदरम्यान तो ट्रकसोबत स्वेच्छेने कराडला गेला असल्याचे समोर आले.

त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी उरुळी कांचन पोलिसांना माहिती देत पियुषला त्यांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्त केले. या प्रकरणी आरोपी रणजित राजपूत आणि एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा रणजित राजपूत याला अटक केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat