Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Lovlina Map Controversy : नॅपकिनवर भारताचा चुकीचा नकाशा पाहून बॉक्सर लव्हलिना भडकली! ग्लासगोतील भारतीय रेस्टॉरंट वादाच्या भोवऱ्यात

Lovlina Map Controversy : नॅपकिनवर भारताचा चुकीचा नकाशा पाहून बॉक्सर लव्हलिना भडकली! ग्लासगोतील भारतीय रेस्टॉरंट वादाच्या भोवऱ्यात

Lovlina Borgohain Map Controversy Mister Singh India Restaurant Glasgow CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Glasgow CWG 2026) देशाचे नाव उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी एका रेस्टॉरंटमध्ये मेजवानीचे (Dinner) आयोजन करण्यात आले होते.

मात्र, या कार्यक्रमानंतर हे रेस्टॉरंट एका मोठ्या वादात अडकले आहे. ‘मिस्टर सिंग इंडिया-द होम ऑफ करी’ या प्रसिद्ध रेस्टॉरंटने खेळाडूंना दिलेल्या पेपर नॅपकिनवर भारताचा चुकीचा आणि अपूर्ण नकाशा (Incorrect Indian Map) छापला होता. हा प्रकार ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती स्टार महिला बॉक्स लव्हलिना बोरगोहेन (Lovlina Borgohain) हिच्या नजरेस पडताच तिने तीव्र संताप व्यक्त केला.

नॅपकिनवरून ईशान्य भारत आणि काश्मीर गायब!

या नॅपकिनवर छापलेल्या भारताच्या बाह्यरेषेतून (Outline Map) देशाचा ईशान्य भाग (North-East India) पूर्णपणे गायब करण्यात आला होता. लव्हलिनाने ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “नॅपकिनवरील नकाशात आमचा ईशान्य भारत नाही. भारताचा प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे आणि तो नकाशात दाखवलाच गेला पाहिजे.”

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (BFI) अध्यक्ष अजय सिंह यांनीही लव्हलिनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यांनी नॅपकिनवर जम्मू-काश्मीरचा नकाशा देखील अपूर्ण असल्याचे दाखवून दिले. सिंह यांनी रेस्टॉरंट प्रशासनाला हे चुकीचे नॅपकिन तात्काळ हटवण्याचे आणि भारताची प्रादेशिक अखंडता राखणारा योग्य नकाशा वापरण्याचे आदेश दिले. रेस्टॉरंटने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

चार पिढ्यांचा वारसा असलेले रेस्टॉरंट!

‘मिस्टर सिंग इंडिया’ हे ग्लासगोमधील अत्यंत लोकप्रिय रेस्टॉरंट असून येथे अनेक क्रीडापटू आणि नामांकित व्यक्ती येत असतात. सिंह परिवाराच्या चार पिढ्या गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पंजाबी खाद्यसंस्कृती आणि स्कॉटिश आदरातिथ्याचा मेळ घालत हे रेस्टॉरंट चालवत आहेत.

– Abhishek Storm 233 : अभिषेक शर्माचा कहर! अवघ्या ९१ चेंडूत २५ षटकारांसह तब्बल २३३ धावांचा पाडला पाऊस

चालू राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत एकूण ३९ पदके (१३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य) जिंकून पदक तालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. मात्र, खेळाडूंच्या सन्मान सोहळ्यात घडलेल्या या प्रकारामुळे रेस्टॉरंटवर कडाडून टीका होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat