Friday, 30 Jul, 9.13 am प्रभात

मुखपृष्ठ
महापालिकेच्या अभियंता व ठेकेदारांचा तक्रारदारावर जीवघेणा हल्ला

पुणे- महापालिकेच्या ड्रेनेज मध्ये झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात माहिती मागवण्यात एकास उप अभियंते व ठेकेदारांनी बेदम मारहाण केली, यासंदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संदिप चंद्रकांत ओझा ( ३८ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, रा.- ४२९, गंजपेठ, महात्मा फुले वाडयाजवळ) यांनी दिलेल्या तक्रारी नुसार दि- २९/११/२०२१ रोजी १२/०० वा ते १२/३० वा. चे सुमारास सावरकर भवन, शिवाजीनगर येथे ललीत बेंद्रे, (ड्रेनेज विभागातील उप अभियंता), प्रकाश कुंभार, (अभियंता), कॉन्ट्रॅक्टर लालु काळूराम देवकर कॉन्ट्रॅक्टर लालु काळूराम देवकर यांचा भाऊ त्याचे नाव माहित नाही यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे, त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की दिनांक २९/०७/२०२१ रोजी साधारणपणे १२/०० वा. ते १२/३० वा. चे दरम्यान भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय येथे ड्रेनेज मध्ये झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात यापूर्वीच पुणे महानगर पालिकेचे सावरकर भवन येथील ड्रेनेज विभागातील उप अभियंता ललीत बेंद्रे व अभियंता प्रकाश कुंभार तसेच कॉन्ट्रॅक्टर लालु काळूराम देवकर यांचे विरुध्द तक्रार केली आहे.

सदर तक्रारीचा राग मनामध्ये धरुन गाऊंड लेवलवर आम्ही दोघे लिफ्ट मधून मी व निर्मल तसेच ड्रेनेज विभागातील उप अभियंता ललीत बेंद्रे व अभियंता प्रकाश कुंभार असे लिफ्ट मधून बाहेर पडत असतानाच लिफ्टचे समोरच्या मोकळ्या जागेत माझ्या ओळखीचे लालु काळूराम देवकर, त्याचा भाऊ नाव माहित नाही यांनी मला पाहताच आत्ता तु आम्हाला सापडला आत्ता तुला मारुन टाकतो असे म्हणुन लिफ्ट मधून माझे सोबत बाहेर पडणारे ड्रेनेज विभागातील उप अभियंता ललीत बेंद्रे आत्ता याला मारुनच टाका असे म्हणले व त्याचवेळी अभियंता प्रकाश कुंभार याने याला कायमचा संपून टाका आमचा त्रास कमी होईल असे म्हणला.

त्यावेळी लालु देवकर याने कमरेत खवलेला कोयता हाताने बाहेर काढून माझे अंगावर धावून आला व माझे डोक्याचे उजवे बाजूस मारुन गंभीर जखमी केले व त्याचा भाऊ नाव माहित नाही याने पाठीमागून येवून त्याचे हातातील फायटरने माझे डावे बाजूच्या बरगडीवर जोरात मारुन जखमी केले. त्यास दाखविलेस मी ओळखतो. म्हणुन माझी वरील चौघांचे विरुध्द कायदेशिर तक्रार दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top