Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maharashtra Politics : हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा? 'गुंगी गुडिया' वाद चिघळला; थेट राहुल गांधींकडे साकडं

Maharashtra Politics : हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा? 'गुंगी गुडिया' वाद चिघळला; थेट राहुल गांधींकडे साकडं

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. या प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. (Maharashtra Politics)

संजय काकडेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय काकडे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. महिला नेत्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसने तातडीने माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा दावा करत राहुल गांधींनी त्यांच्यावर कारवाई करावी, असेही काकडे म्हणाले. (Maharashtra Politics)

सपकाळ यांच्या हटवण्याची मागणी

काकडे यांनी पुढे बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपदावर ठेवू नये, असे सांगत राहुल गांधींनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच काँग्रेसने आपली भूमिका मागे घ्यावी आणि संबंधित वक्तव्याबद्दल माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले. (Maharashtra Politics)

मुख्यमंत्री फडणवीसांचाही पलटवार

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वादावर प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला. अशा प्रकारची विधाने ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी असल्याचे सांगत त्यांनी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी खालच्या पातळीवरील राजकारण केले जात असल्याची टीका केली. अशा प्रकारच्या वक्तव्यांना जनता योग्य उत्तर देईल, असेही फडणवीस म्हणाले. (Maharashtra Politics)

काँग्रेसच्या पोस्टपासून सुरू झालेला हा वाद आता राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे अधिकच चिघळला असून, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : सुनेत्रा पवारांचा ‘गुंगी गुडीया’ उल्लेख; काँग्रेसच्या पोस्टमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भडका

Maharashtra Politics : मनसेला मोठा धक्का; ८ प्रमुख नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat