Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maharashtra Politics : मोठी घडामोड..! देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? 'या' बड्या नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Politics : मोठी घडामोड..! देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? 'या' बड्या नेत्याचा मोठा दावा

प्रभात 2 weeks ago

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत बोलावून केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे राऊत यांनी म्हटले आहे.

(Maharashtra Politics)

संजय राऊत म्हणाले की, देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. शिक्षण हे देशाच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाचे खाते असून त्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. (Maharashtra Politics)

पुढे बोलताना त्यांनी दावा केला की, देवेंद्र फडणवीस हे उच्च शिक्षित आणि अनुभवी प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे केंद्रीय शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार करत आहेत. राऊत यांनी असेही म्हटले की, माझ्याकडे याबाबत माहिती आहे. फडणवीस केंद्रात गेले तरी भाजप नवीन मुख्यमंत्री नेमू शकते. पक्षाकडे नेतृत्वाची कमतरता नाही. (Maharashtra Politics)

दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील कोणत्याही फेरबदलबाबत अद्याप केंद्र सरकार अथवा भाजपकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : शिंदेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराची आमदारकी रद्द होणार? कोर्टाच्या निर्णयाने उडाली खळबळ

Maharashtra Politics : काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का! नगरसेविकेसह NCP उमेदवाराचे जात प्रमाणपत्र अवैध; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat