Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maharashtra, Weather : राज्यात पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या कुठे-कधी बरसणार?

Maharashtra, Weather : राज्यात पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या कुठे-कधी बरसणार?

Maharashtra, Weather : जुलै महिन्यात राज्यभर दमदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.

(Maharashtra, Weather)

मात्र, या काळात काही जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि स्थानिक पातळीवर जोरदार सरींचा अंदाज असल्याने मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra, Weather)

हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांच्या मते, 15 ऑगस्टपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर मात्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra, Weather)

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या पॅसिफिक महासागरात ‘मध्यम एल निनो’ परिस्थिती सक्रिय असून त्याचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात दिवसाचे आणि रात्रीचे तापमानही सामान्यपेक्षा अधिक राहू शकते. (Maharashtra, Weather)

दरम्यान, वेदर विश्लेषक राजेश कपाडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरी 324.2 मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात 454.2 मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा तब्बल 72 टक्के, कोकणात 33 टक्के, विदर्भात 21 टक्के आणि मराठवाड्यात 17 टक्के अधिक पाऊस झाला. (Maharashtra, Weather)

पुढील चार दिवसांचा जिल्हानिहाय अलर्ट

2 ऑगस्ट :
रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता.

3 ऑगस्ट :
रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम.

4 ऑगस्ट :
बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांसह पावसाचा अंदाज.

5 ऑगस्ट :
बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने नागरिकांनी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या काळात सुरक्षित ठिकाणी राहण्याचे तसेच आवश्यक नसल्यास उघड्यावर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra, Weather)

Maharashtra Weather : महाराष्ट्रात धो धो पाऊस कोसळणार; हवामान विभागाकडून महत्त्वाचं अपडेट

Maharashtra Weather Update : गायब झालेला पाऊस पुन्हा एन्ट्री करणार; काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat