Tuesday, 26 May, 4.37 pm प्रभात

मुखपृष्ठ
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही - राहुल गांधी

नवी दिल्ली - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची काल एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. चव्हाण यांच्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ते एका कार्यकर्त्याला उद्देशून राज्यात आमचं नव्हे तर शिवसेनेचं सरकार सत्तेत असल्याचं सांगत आहेत. हे प्रकरण ताज असतानाच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील अशाच प्रकारचं एक वक्तव्य केलं आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी, 'दाट वसाहत असलेल्या ठिकाणी करोनाचा प्रसार जास्त होतो. मुंबई आणि दिल्लीतील रुग्ण संख्या वाढण्यामागे देखील हेच कारण आहे. महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा असला तरी मोठे निर्णय घेण्याइतपत अधिकार काँग्रेसला नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेऊ शकतो. अस असलं तरी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळायला हवी. आम्ही सरकारला सूचना करू शकतो. त्या स्वीकारायच्या की नाही हे सरकारवर अवलंबून आहे.' असं वक्तव्य केलं.

राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>