Dailyhunt
महात्मा गांधी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

महात्मा गांधी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रभात 6 years ago

राजगुरुनगर : महात्मा गांधी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आणि समाज प्रबोधन करणारी नृत्य सादर केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाला मान्यवरांनी चांगला प्रतिसाद दिला.

या कार्यक्रम प्रसंगी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले, नायब तहसीलदार राजेश कानसकर, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख राजगुरुनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर यांच्यासह तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat