Monday, 09 Sep, 8.20 pm प्रभात

मुख्य पान
महिला वकिलाकडून पोलीस निरीक्षकांना शिवीगाळ

दौंड येथील रावणगाव दूरक्षेत्राच्या हद्दीतील घटना

दौंड- दौंड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकांना रावणगाव पोलीस दूरक्षेत्र येथे शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी महिला वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार ओमासे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार (दि. 8) सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान दौंड पोलीस स्टेशनअंतर्गत रावणगाव पोलीस दूरक्षेत्र येथे पोलीस उपनिरीक्षक तेजस मधुकर मोहिते हे आपल्या स्टाफसह हजर असताना महिला वकील मयुरी काळे (रा. खडकी, ता. दौंड) यांनी त्यांचा भाऊ प्रदीप काळे व त्याच्या गाडीची चावी आत्ताच्या आत्ता पाहिजे, असे बोलत फोनवरून एकेरी भाषेत हुज्जत घालून रावणगाव पोलीस दूरक्षेत्र येथे स्वतः येऊन पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांना गडचिरोलीला काम करून आला म्हणून जास्त शहाणा होऊ नको, हे गडचिरोली नाही. तुला इथेच राहायचे आहे ना, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करून पोलीस उपनिरीक्षक मोहिते हे करीत असलेल्या कामात अडथळा आणला. म्हणून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक तेजस मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खरात पुढील तपास करीत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top