Saturday, 25 Sep, 6.53 pm प्रभात

मुखपृष्ठ
महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कमला भसीन यांचे निधन

नवी दिल्ली - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमला भसिन यांचे काल रात्री निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांनी महिलांच्या अधिकाराच्या संबंधात मोठे काम केले आहे. त्यांचे हे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहचले होते. दक्षिण अशियातील देशांतील महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी मोठा लढा दिला. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या बरोबर चळवळीत काम करणाऱ्या कविता श्रीवास्तव यांनी ट्‌विटरवर दिली.

त्यांनी भसिन यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की त्यांच्या निधनाने महिला हक्कांच्या लढ्याला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी भारतातील महिलांबरोबरच दक्षिण अशियातल्या देशांतील महिलांच्या हक्‍कांसाठीही मोठा लढा दिला होता. अत्यंत संघर्षाच्या वातावरणात त्यांनी हे काम केले. या चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्या स्मृती कायम राहतील असेही कविता श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top