Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माझ्या नवऱ्याला दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं, आरोपी अमोल खुणेच्या पत्नीचा धक्कादायक दावा

माझ्या नवऱ्याला दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं, आरोपी अमोल खुणेच्या पत्नीचा धक्कादायक दावा

प्रभात 9 months ago

बीड : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक झालेल्या अमोल खुणे यांच्या कुटुंबीयांनी धक्कादायक दावा केला आहे. 'मागील एक महिन्यापासून माझ्या नवऱ्याला दारू पाजून नशेत ठेवले आणि जरांगे पाटीलांविरोधात षडयंत्र रचायला लावले.

अमोल हे तर जरांगे पाटीलांचे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांना देव मानतात. त्यांचा यात काहीही संबंध नाही, त्यांना फसवून अडकवले आहे,” असे आरोपी अमोल खुणे यांची पत्नी आणि आई भावूक होऊन म्हणाल्या. आईला तर अश्रू अनावर झाले.

जालना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बीड जिल्ह्यातील धानोरा येथील अमोल खुणे आणि दादा गरुड यांना अटक केली आहे. जरांगे पाटीलांच्या सहकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल झाला. अमोल खुणे हे जरांगे पाटीलांचे पूर्वीचे निकटवर्तीय असल्याने प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

धनंजय मुंडेंनी २.५ कोटींची सुपारी दिली; जरांगेचे आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. “धनंजय मुंडेंचा पीए कांचन पाटील याने आरोपींना बीडच्या रेस्टहाऊसमध्ये बैठक घेऊन सुपारी दिली. २.५ कोटींमध्ये डील झाली. मला बदनाम करण्यासाठी फेक व्हिडिओ आणि औषध देऊन मारण्याचा प्लॅन होता. मी नार्को टेस्टला तयार आहे, धनंजय मुंडे यांनीही करावी,” असे जरांगे म्हणाले. त्यांनी ऑडिओ क्लिपही ऐकवली.

धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर

धनंजय मुंडे यांनी आरोप फेटाळले. “हे जरांगे पाटीलांचेच लोक आहेत, माझा यात काहीही संबंध नाही. माझे ब्रेन मॅपिंग आणि जरांगेंची नार्को टेस्ट करा. सीबीआय चौकशी करावी, मी मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती करणार,” असे मुंडे म्हणाले. त्यांनी हे राजकीय बदनामीचा प्रयत्न असल्याचा दावा केला.

प्रकरणात पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचाही उल्लेख झाला असून, जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चौकशी सुरू असून, राजकीय वातावरण तापले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat