Dailyhunt
मालाड इमारत दुर्घटना : ठेकेदारासह इमारत मालकास अटक

मालाड इमारत दुर्घटना : ठेकेदारासह इमारत मालकास अटक

प्रभात 4 years ago

मुंबई - मुंबई शहरातील मालाडमध्ये रहिवासी चारमजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी एका व्यक्तीला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेप्रकरणी ही पहिलीच कारवाई आहे. रमजान शेख असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रफिक सिद्दीकी इमारत मालकास सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.

मालवणी पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी ठेकेदार रमजान शेख याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा ठेकेदार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच इमारत मालक रफिक सिद्दीकी यालाही आरोपी करण्यात आले असून त्यास सुद्धा मालवणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ८ लहान बालकांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat