Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने स्वतःसाठी एक नवीन कार खरेदी केली आहे. मलायकाने पिवळ्या रंगाची महिंद्रा थार रॉक्स स्टार एडिशन कार घेतली आहे. या नव्याकोऱ्या कारची पूजा करताना मलायकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मात्र यातील एक गोष्ट खटल्याने काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.
या व्हिडीओत मलायका गाडीची पूजा करताना दिसत आहे. अभिनेत्रीने डीप नेक ड्रेस घातल्याचं दिसत आहे. मॉर्डन असूनही परंपरा जपत गाडीची पूजा केल्याने मलायकाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र गाडीची पूजा करताना, हातात आरतीचं ताट असताना मलायकाच्या पायात चप्पल बघून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
“सँडल घालून पूजा करायची नसते एवढं पण माहीत नाही का”, “एवढा दिखावा केलाच आहे तर चप्पल पण काढायची होती ना”, “सँडल घालून पूजा करणं म्हणजे मॉडर्न नाही”, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी मलायकावर टीका केली आहे. इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मलायकाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
कारची किंमत किती?
मलायका अरोराने Mahindra Thar Roxx Star Edition खरेदी केली आहे. या SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे १६.८५ लाख रुपये आहे. तिच्या दमदार लूक आणि ऑफ-रोड क्षमतेसाठी ओळखली जाणारी ही कार तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. थार रॉक्स स्टार एडिशनमध्ये पियानो-ब्लॅक १९-इंच अलॉय व्हील, कॉन्ट्रास्ट ब्लॅक रूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि ३६०-डिग्री कॅमेरा यांसारखे अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय यात प्रीमियम इंटीरियर आणि ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स देखील असल्याने ही कार अधिक खास बनली आहे.

