Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Manchar News : 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर हुतात्मा बाबू गेणू विद्यालयासाठी स्कूल बस

Manchar News : 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर हुतात्मा बाबू गेणू विद्यालयासाठी स्कूल बस

मंचर : महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथील ग्रामविकास फाउंडेशन संचलित हुतात्मा बाबू गेणू विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना दररोज पायी किंवा सायकलने प्रवास करावा लागत होता.

शिवाय परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पालकांमध्ये कायम भीतीचे वातावरण होते. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामविकास फाउंडेशनने ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन स्कूल बस सेवा सुरू केली असून, त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या नवीन बससेवेच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ढोल-ताशे व लेझीमच्या गजरात बसचे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा बाबू गेणू आणि देशभक्त अण्णासाहेब आवटे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बसचे पूजन करण्यात आले. यावेळी बसचे मालक अनिकेत भालेराव यांचा सत्कार करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेढ्यांचे वाटप करण्यात आले. या बससेवेचा लाभ कळंब, कळंबई, टाकेवाडी, पाटीलवाडी, विठ्ठलवाडी, नांदूर आणि रामवाडी येथील विद्यार्थ्यांना होणार आहे. ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पडवळ यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होईल, वेळेची बचत होईल आणि शाळेची पटसंख्या वाढण्यास मदत मिळेल. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषदेचे सदस्य दादाभाऊ चासकर, के. जे. आवटे, दत्ता पडवळ, सुधीर शिशुपाल, मुकुंद बारवे, बाबाजी चासकर, सतीश जाधव, दीपक चासकर, पांडुरंग बनकर, परशुराम पडवळ, एकनाथ आंबटकर, भरत पडवळ, विकास पडवळ, किशोर डोके, दिनेश आवटे, योगेश पडवळ, ज्ञांनेश्वर घोडेकर, मंगलदास आवटे, गणेश सोलाट, रमेश सैद, प्रभाकर आवटे, अशोक जाधव, आप्पाजी पडवळ, निवृत्ती चासकर, भालचंद्र बोठे, उदय आंबटकर, संदीप पडवळ, भास्कर जाधव, सुजाता चासकर ,जयश्री दहितुले, शीतल आवटे, ग्रामस्थ आणि शाळेचे पर्यवेक्षक अविनाश वाडेकर व शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रदीप डोके यांनी सूत्रसंचालन व बाबाजी चासकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य साहेबराव काळे यांनी आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat