Thursday, 06 Aug, 9.25 am प्रभात

मुख्य बातम्या
मंचर येथे कारसेवक कडधेकरांचा सत्कार

मंचर - येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाच्या वतीने श्रीराम आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन बुधवारी (दि. 5) करण्यात आले. तर कारसेवक शशिकांत कडधेकर यांचा सत्कार संजय थोरात आणि पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच भूमिपूजनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी थोरात यांच्या पुढाकाराने लाडू वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपचे नेते जयसिंगराव एरंडे, तालुका अध्यक्ष डॉ. तारांचद कराळे, रवींद्र त्रिवेदी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष कैलास राजगुरव, डॉ. दत्ता चासकर, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, संदीप बाणखेले, जयप्रकाश वळसे पाटील, भगवान ढुमणे गुरुजी, सोमनाथ फल्ले, नवनाथ थोरात, ऍड. मृणालिनी पडवळ, ऍड. स्वप्ना खामकर, मनिषा चासकर यांसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भाजपचे माजी तालुका ध्यक्ष रवींद्र त्रिवेदी यांनी श्रीराम मंदिराच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जयप्रकाश वळसे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मंचर येथील आरती कडधेकर यांनी पोलीस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस जवानांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. मंचर शहरातील पुरातन श्रीराम मंदिरात पूजा-आरती करण्यात आली. यावेळी बजरंग दलाचे अक्षय जगदाळे, हेमंत लोखंडे, सचिन पठारे, भावेश आचार्य यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top