Tuesday, 12 Feb, 6.25 pm प्रभात

मुख्य पान
मंचरला महिला मेळावा उत्साहात

मंचर- येथील शिवगिरी मंगल कार्यांलयात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुषमा शिंदे, शरद बॅंकेच्या संचालिका पुष्पा जाधव, सरस्वती शिंदे, गायत्री वाळेकर, शितल दैने, दिपाली लोखंडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वळसे पाटील म्हणाल्या की, भविष्यात रोजगार निर्मितीला वाव मिळणार आहे. महिलांना उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन व अर्थसहाय्य केले जाईल. उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यासाठी महिलांना मोफत प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी अनुसया महिला उन्नती केंद्राच्या वतीने विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. आंबेगाव-शिरुर तालुक्‍यात अनेक महिलांनी टेलरिंग, हॉटेल, कापड दुकाने, ब्युटी पार्लर, गाईपालन, शेळीपालन, दूध व्यवसाय, नाचणीचे पापड, शेवया, लोणचे, सेंद्रिय खतनिर्मिती आदी व्यवसाय सुरु केले आहेत. उत्कृष्ट पॅकिंग व विक्री व्यवस्थापनाचेही प्रशिक्षण देण्याचे नियोजन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. ज्योती निघोट यांनी प्रास्ताविक केले.

सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले तर वैशाली बेंडे यांनी आभार मानले.

Dailyhunt
Top