Sunday, 24 Jan, 11.24 am प्रभात

ताज्या बातम्या
मांडवात पोहोचण्यापूर्वीच वरूनच्या गाडीचा अपघात; वाचा सविस्तर बातमी.

मुंबई - बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आज म्हणजेच, 24 जानेवारी रोजी आपली गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या शाही विवाहसोहळयासाठी संपूर्ण बॉलिवूड अलिबाग मध्ये दाखल झाले आहे. अलीबाग येथील 'द मॅन्सन हाउस' या शानदार रिसॉर्टमध्ये दोघेजण सात फेरे घेणार आहेत. हा सोहळा एक प्रायव्हेट सेरेमनी म्हणून आयोजित करण्यात आला असून यात दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहे.

दरम्यान, लग्न मांडवात पोहोचण्यापूर्वीच वरून धवनच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. काल (दि. 23) शनिवारी ही घटना घडली. अलिबागमध्ये ट्रॅफिक आणि रस्ते काही ठिकाणी अरुंदही आहेत. त्याचवेळी रस्त्यात छोटासा अपघात झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. गाडीला डेंट आल्याची माहिती आहे. परंतु वरुणसह गाडीतील सर्वजण सुखरुप आहेत. काल वरूनचा हळदी, मेहंदी असे विविध कार्यक्रम पार पडले.

आज वरुण-नताशा लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नासाठी काही 50 लोक येणार असल्याची माहिती आहे. डेविड धवन यांनी दोघांच्या लग्नासाठी खास व्यवस्था केली आहे. सुरक्षेसह पाहुण्याच्या प्रायव्हसीचीही कडक सुविधा करण्यात आली आहे. हा विवाह सोहळा एक प्रायव्हेट सेरेमनी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top