Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Manoj Jarange : मनोज जरांगेंचे उपोषण मागे! मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष, सातारा गॅझेटसाठी.; मध्यरात्री कोणत्या मागण्यांवर निघाला तोडगा?

Manoj Jarange : मनोज जरांगेंचे उपोषण मागे! मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष, सातारा गॅझेटसाठी.; मध्यरात्री कोणत्या मागण्यांवर निघाला तोडगा?

प्रभात 3 months ago

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथील एका ठिकाणी त्यांच्या उपोषणाला सुरूवात केली. त्यानुसार भर उन्हामध्ये पायात चप्पल नाही, अन्न आणि पाणी न घेता मनोज जरांगे बाजवर रणरणत्या उन्हात उपोषणाला बसले होते.

हे आंदोलन कठोर असणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले होते.

मात्र मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण मागे घेतलं आहे. अभ्यासकांच्या सूचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रात्री साडेदहा वाजता जरांगे पाटलांची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री 1.15 वाजता पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं.

सरकारच्या ड्राफ्टनुसार येत्या मंगळवारपर्यंत (२ जून) शासन निर्णय काढण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे हे उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जर मंगळवारपर्यंत आदेश निघाले नाहीत, तर पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

कोणत्या मागण्यांवर काढला तोडगा?

सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी एक महिना वेळ न्या.शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे देणार मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन 58 लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना दिले जाणार आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे-पाटलांचीही स्वतंत्र हेल्पलाईन जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसांत बैठक घेणार

Pune MSRTC : डिझेलचा खर्च वाचला! एसटीच्या १०५ ई-बसेसमुळे रोज 'इतक्या' हजार लिटर इंधनाची बचत

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat