Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Manoj Jarange : तळपत्या उन्हात उपोषण सुरु असतानाच मनोज जरांगेंना मोठा धक्का; 'या' प्रकरणाची ED चौकशी होणार?

Manoj Jarange : तळपत्या उन्हात उपोषण सुरु असतानाच मनोज जरांगेंना मोठा धक्का; 'या' प्रकरणाची ED चौकशी होणार?

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण झाला आहे. जरांगे यांना मारण्याची 'सुपारी' घेतल्याच्या प्रकरणातील आरोपी म्हणून चर्चेत आलेले अमोल खुणे यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या आंदोलनामागील हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

(Manoj Jarange)

माध्यमांशी संवाद साधताना अमोल खुणे यांनी दावा केला की, मनोज जरांगे यांचे सध्याचे उपोषण मराठा समाजाच्या हितासाठी नसून रद्द झालेली शेकडो कोटी रुपयांची कंत्राटे पुन्हा मिळवण्यासाठी असल्याचा संशय आहे. त्यांनी ९८६ कोटी, १५० कोटी आणि ३० कोटी रुपयांच्या कथित टेंडरांचा उल्लेख करत या आंदोलनामागे आर्थिक हितसंबंध असू शकतात, असा आरोप केला. (Manoj Jarange)

खुणे यांनी पुढे बोलताना जरांगे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेत झालेल्या कथित वाढीची चौकशी करण्याची मागणी केली. "जरांगे यांच्या मालमत्तेत अचानक वाढ कशी झाली? त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जमीन आणि मालमत्ता कशी खरेदी केली?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. (Manoj Jarange)

याशिवाय, या सर्व प्रकरणातील संबंधित व्यक्तींची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी करताना अमोल खुणे यांनी स्वतःचीही नार्को टेस्ट करण्याची तयारी दर्शवली. "जर माझ्यावरील आरोप खरे ठरले तर कोणतीही शिक्षा स्वीकारण्यास तयार आहे," असे ते म्हणाले. (Manoj Jarange)

यावेळी त्यांनी काही लोकप्रतिनिधींवरही टीका केली आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली राजकारण होत असल्याचा आरोप केला. तसेच कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत, त्याचा सर्वसामान्य मराठा समाजाला अपेक्षित लाभ झालेला नसल्याचा दावा केला. (Manoj Jarange)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat