Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Manoj Jarange : विखे पाटलांना जरांगेंचे थेट आव्हान; 58 लाख कुणबी नोंदींवरून सरकारला इशारा

Manoj Jarange : विखे पाटलांना जरांगेंचे थेट आव्हान; 58 लाख कुणबी नोंदींवरून सरकारला इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सार्वजनिक आव्हान दिले आहे. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, 'तुम्ही अंतरवालीत या, आम्ही समोरासमोर मराठा समाजासमोर सत्य मांडतो.

सरकार सांगत असलेली माहिती खरी की आम्ही सांगत असलेली माहिती खरी, याचा निर्णय समाजच घेईल,” असे आव्हान जरांगेंनी दिले. (Manoj Jarange)

कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या नागरिकांनी 28 तारखेला अंतरवालीत यावे, असे आवाहन करत त्यांनी सरकारच्या विविध दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बलिदान देणाऱ्या कुटुंबांना नोकऱ्या दिल्याचा दावा, 900 गुन्हे मागे घेतल्याचा दावा आणि 58 लाख कुणबी नोंदींवरून प्रमाणपत्रे दिल्याचा दावा हे सर्व चुकीचे असल्याचा आरोप त्यांनी केला.

29 ऑगस्ट 2025 पासून आजपर्यंत समितीने एकही नवीन नोंद शोधलेली नाही. एकनाथ शिंदे यांनी सहा महिन्यांत 58 लाख नोंदी शोधल्या, मग आता प्रक्रिया का थांबली?” असा सवाल करत त्यांनी सरकारवर मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. (Manoj Jarange)

58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, “एकही नोंद कमी करू नका. अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि रस्ते बंद झाले तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला. (Manoj Jarange)

दरम्यान, अभिजीत दिपके यांच्या कथित धमकीच्या संदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, धमक्यांना आम्ही घाबरत नाही. गरीब मराठ्यांच्या हितासाठी संयम ठेवत आहोत, पण धमक्या दिल्या तर त्यालाही आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat