Friday, 25 Sep, 4.24 pm प्रभात

ताज्या बातम्या
मावळ : वडगावात दोन ठिकाणी पोलिसांचे छापासत्र

  • जुगार अड्ड्यांवर कारवाई : सोळा जणांना घेतले ताब्यात

वडगाव मावळ - वडगाव नगरपंचायत हद्दीत दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर वडगाव मावळ पोलिसांनी कारवाई केली. गुरुवारी (दि. 24) सायंकाळी चार वाजता ही कारवाई करुन 16 आरोपींना ताब्यात घेतले. एक लाख 14 हजार 65 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दर्शन संजय वहिले (वय 23, रा. शिवाजी चौक, वडगाव, ता. मावळ), बाळू भीमा गायकवाड (वय 39, रा. तळेगाव स्टेशन, ता. मावळ), श्रेयश अशोक घारे (वय 22, रा. मधुबन कॉलनी), महेश काशीनाथ गायकवाड (वय 26, रा. आंबेडकर कॉलनी), शुभम बाबू पानसे (वय 22, रा. मधुबन कॉलनी), मुकेश गुलाब चव्हाण (वय 27, रा. माळीनगर), प्रणीत महेश लोहार (वय 25, रा. मधुबन कॉलनी), अनिकेत अरविंद भोसले (वय 22, रा. केशव नगर), एकनाथ नरसिंग व्यवहारे (वय 19, रा. खंडोबा मंदिराजवळ), स्वप्नील भाऊ काजळे ( वय 19, रा. कुडेवाडा, सर्व रा. वडगाव, ता. मावळ).

दिनेश सौगतसिंग चौहान (वय 28, रा. आंबेडकरनगर), यश कैलास चव्हाण (वय 27, रा. केशव नगर), साई शिवाजी कदम (वय 22, रा. केशव नगर), स्वप्नील बाळासाहेब ढोरे (वय 30, रा. चावडी चौक), व अंकुश उर्फ पिंटू अशोक सुरवसे (वय 30, रा. दिग्वीजय कॉलनी, वडगाव, व रोहित बापू नायडू (वय 33, रा. किरकटवाडी, उत्सव सोसायटी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून कारवाई करत तब्बल एक लाख 14 हजार 65 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करत वडगाव पोलीस ठाण्यामध्ये दोन जुगार अड्‌डे सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि. 24) सायंकाळी 4 वाजता वडगाव येथील शिवाजी चौकातील जय जवान गणेश मंडळामागील मोकळ्या जागेत छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एकूण 78 हजार 990 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. येथील दर्शन संजय वहिले व अन्य 9 जणांना ताब्यात घेऊन वडगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

त्यानंतर वडगावमधील इंद्रायणीनगर येथील एक घरामागील मोकळ्या जागेत छापा टाकून जुगार खेळणऱ्या 6 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील 35 हजार 75 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी दिनेश सौगतसिंग चौहान व अन्य 5 जणांना वडगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

असे वडगावमधील दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर कारवाई करून एक लाख 14 हजार 65 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, पोलीस नाईक लियाकत मुजावर, पोलीस कर्मचारी सुधीर अहिवळे, अक्षय नवले यांच्या पथकाने ही कारवाई केली. वडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी दीपक गायकवाड व गणेश तावरे यांनी फिर्याद दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top