Friday, 24 Sep, 7.08 pm प्रभात

ताज्या बातम्या
मायक्रोसॉफ्टच्या 'या' नवीन फीचरच्या मदतीने पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासापासून होईल सुटका!

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण अनेक प्रकारच्या पासवर्डने वेढलेले आहोत. आजच्या काळात सोशल मीडिया, इंटरनेट बँकिंग, गेम्स, स्मार्टफोन आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे. वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी पासवर्ड आहे. अशा स्थितीत पासवर्ड ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. पण पासवर्ड लक्षात ठेवणे देखील एक त्रास आहे. कधीकधी आपण आपला पासवर्ड विसरतो ज्यामुळे खूप त्रास होतो. अशा परिस्थितीत, मायक्रोसॉफ्टच्या नवीन फीचरच्या मदतीने, विंडोज संगणक आणि लॅपटॉपवरील मायक्रोसॉफ्ट खात्याचा पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासापासून तुम्ही सुटका कराल.

हे फिचर काय आहे?

मायक्रोसॉफ्टच्या या फिचरच्या मदतीने वापरकर्ते पासवर्ड न वापरता त्यांच्या मायक्रोसॉफ्ट खात्यात प्रवेश करू शकतील. याला पासवर्डलेस साइन-इन म्हणतात. यासाठी संगणक किंवा लॅपटॉपवर विंडोज 10 असणे आवश्यक आहे. हे फिचर लवकरच विंडोज 11 वर देखील येऊ शकते.

पासवर्डलेस साइन-इन कसे वापरावे?

पासवर्डलेस साइन-इन वापरण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घेऊया.

- सर्वप्रथम तुमच्या विंडोज 10 संगणक किंवा लॅपटॉपवर वेब ब्राउझरवर मायक्रोसॉफ्टचे अधिकृत वेबपेज उघडा.

- त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.

- आता सिक्युरिटीच्या पर्यायावर क्लिक करा.

- त्यानंतर अतिरिक्त सुरक्षेच्या पर्यायावर क्लिक करा.

- आता अतिरिक्त सुरक्षा मध्ये 'पासवर्डलेस' हा पर्याय दिसेल. हे सुरू करा.

- यानंतर, आपल्या विंडोज 10 संगणक किंवा लॅपटॉपवर पासवर्डलेस साइन-इनसाठी आवश्यक स्टेप्स पूर्ण करून ओके करा.

- आता तुम्ही पासवर्डलेस साइन-इन वापरू शकाल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top