Tuesday, 21 May, 4.54 am प्रभात

मुख्य पान
मायावतींचा दिल्ली दौरा रद्द; लखनौमध्ये अखिलेश यांची घेतली भेट

लखनौ: बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या आज दिल्लीला जाणे अपेक्षित होते पण त्यांचा दिल्ली दौऱ्याचा कार्यक्रम आज रद्द करण्यात आला. तथापी मायावती यांनी आज समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यांची भेट घेऊन सद्य राजकीय स्थितीवर चर्चा केली. मायावती यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे तासभर चर्चा झाली. एक्‍झिट पोल निकाला मध्ये सपा-बसपा आघाडीविषयी संमिश्र संकेत देण्यात आले आहेत.

उत्तरप्रदेशातील 80 जागांपैकी सपा-बसपा आघाडीला 40 जागा मिळतील आणि एनडीए आघाडीला 38 जागा मिळतील असा अंदाज सीवोटर-रिपब्लीक संस्थेने वर्तवला आहे. तर एबीपीच्या एक्‍झिट पोल मध्ये या आघाडीला तब्बल 56 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संस्थेने भाजपला 22 जागा दिल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या राज्यात मित्र पक्षांसह 80 पैकी 73 जागा मिळवल्या होत्या. सद्य राजकीय स्थितीत केंद्रात त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात आली तर या आघाडीला महत्वाचे स्थान मिळणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top