Wednesday, 05 Aug, 8.48 am प्रभात

ताज्या बातम्या
मी किशार कुमारचा चाहता : आयुष्मान खुराना

अभिनेता आयुष्मान खुराना याने किशोर कुमार यांच्या 91 व्या जन्मदिनानिमित्त इंस्ट्राग्रामवर एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो 1972 सालातील 'मरे जीवन साथी' या चित्रपटातील 'ओ मेरे दिल के चैन' हे गीत गाताना दिसत आहे.
आयुष्मान म्हणाला की, मी किशोर कुमार यांचा खूप मोठा चाहता आहे. ते माझे सर्वांत आवडते गायक आहेत. मी दिवसभरात त्यांचे गाणे आवडीने ऐकतो.

किशोर कुमार यांच्या आवाजात काहीतरी जादू होती. ते वेगवेगळ्या प्रकारचे गाणे गाऊ शकत होते. त्यांच्याजवळ जीवन जगण्याचा योग्य दृष्टीकोन होता, असेही आयुष्मान म्हणाला. 'बाला' स्टार आयुष्मानने काही वर्षांपूर्वीचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ 2018 या वर्षातील आहे.

'बाला' या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चित्रपटसृष्टीत कौतुक करण्यात आले होते. अभिषेक कपूर यांच्या आगामी चित्रपटात आयुष्मान खुराना एका ऍथलेटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे अजून नाव ठरलेले नाही. या चित्रपटाचे शुटिंग ऑक्‍टोबरमध्ये सुरू होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top