Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
MLC Election : मित्रपक्षाला मोठा धक्का..! विधानपरिषदेसाठी भाजपचा पहिला उमेदवार जाहीर, 'हा' माजी मंत्री मैदानात

MLC Election : मित्रपक्षाला मोठा धक्का..! विधानपरिषदेसाठी भाजपचा पहिला उमेदवार जाहीर, 'हा' माजी मंत्री मैदानात

प्रभात 2 months ago

MLC Election : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच भाजपने मोठी चाल खेळत पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री प्रवीण पोटे यांना उमेदवारी जाहीर केली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

(MLC Election)

प्रवीण पोटे शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपच्या या निर्णयामुळे महायुतीतील काही मित्रपक्षांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (MLC Election)

या जागेसाठी भाजपमध्येही मोठी रस्सीखेच सुरू होती. प्रवीण पोटे यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर असले तरी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी त्यांच्या उमेदवारीला उघड विरोध केला होता. तर माजी खासदार नवनीत राणा यांनीही पोटे यांच्या नावाला विरोध दर्शवत भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. (MLC Election)

लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रवीण पोटे यांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप राणा दाम्पत्याकडून वारंवार करण्यात आला होता. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीवरून महायुतीत मतभेद उफाळल्याची चर्चा होती. मात्र अखेर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने प्रवीण पोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. (MLC Election)

शुक्रवारी दुपारी १२ वाजता प्रवीण पोटे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यावेळी भाजपचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. (MLC Election)

दरम्यान, काँग्रेसने अद्याप या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून असल्याने पुढील एक-दोन दिवसांत काँग्रेसचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, रवी राणा यांनीही निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र भाजपच्या घोषणेनंतर त्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (MLC Election)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat