Monday, 13 Jul, 4.53 pm प्रभात

मुखपृष्ठ
मोदींसोबतच्या चर्चेनंतर सुंदर पिचई यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलल्यानंतर सुंदर पिचई यांनी गुगल भारतात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. सुंदर पिचाई यांनी 'गुगल फॉर इंडिया डिजिटलायझेशन फंड' जाहीर केले, ज्याद्वारे ते पुढील 5-7 वर्षांत भारतात 75,000 कोटींची गुंतवणूक करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाचे सुंदर पिचई यांच्याशी संवाद साधला. दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. मोदी यांनी ट्विट केले की, आज सकाळी सुंदर पिचईंबरोबर एक अतिशय यशस्वी संवाद झाला. आम्ही बर्‍याच विषयांवर बोललो, विशेषत: तंत्रज्ञानाच्या शक्तीमुळे भारतातील शेतकरी, तरुण आणि उद्योजकांचे जीवन बदलू शकले.

संभाषण दरम्यान सुंदर पिचई आणि नरेंद्र मोदी यांच्यात कोरोनाच्या काळात उदयाला येत असलेल्या नवीन कार्यसंस्कृतीबद्दल चर्चा झाली. तसेच कोरोना विषाणूच्या जागतिक साथीने खेळासारख्या क्षेत्रात कोणती आव्हाने आणली आहेत चर्चा केल्याची माहिती मोदींनी दिली.

नरेंद्र मोदी म्हणाले, आम्ही डेटा सुरक्षा आणि सायबर सुरक्षेचे महत्त्व यावरही बोललो. शिक्षण व डिजिटल देयकाच्या क्षेत्रात गुगलच्या प्रयत्नांविषयी मला आनंद झाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top