Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
MP Srirang Barne : स्पेशल युनिट बनवा, अवैध धंदे मोडून काढा! खासदार श्रीरंग बारणेंचे पोलिसांना कडक आदेश

MP Srirang Barne : स्पेशल युनिट बनवा, अवैध धंदे मोडून काढा! खासदार श्रीरंग बारणेंचे पोलिसांना कडक आदेश

प्रभात 4 months ago

MP Srirang Barne - विषारी दारु पिल्याने दापोडीतील फुगेवाडीतील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्देवी आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी पोलिसांना स्वतंत्र युनीट स्थापन करावे.

शहरातील अवैध धंदे, त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलिसांना दिली आहे. या मृतांच्या नातेवाइकांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दापोडीतील फुगेवाडीत एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाला आहे. खासदार बारणे यांनी दापोडी पोलीस ठाण्यात भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्याकडून घटनेचे सविस्तर माहिती घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अधीक्षक अतुल कानडे यावेळी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, ही गावठी दारु हडपसर येथील लमान तांडा येथे बनवून विविध विभागात पाठवली जात होती. परदेशी नावाच्या व्यक्तीने सिंग, राठोडला दारु दिली. त्यात केमिकल मिसळण्यात आले. त्याचे प्रमाण जास्त असल्याने दारु विषारी झाली. तिचे प्राशन केल्याने पिंपरी-चिंचवडमधील सात जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांची प्रकृती गंभीर आहे. पुण्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

दापोडीतील मृत्यू झालेले नागरिक गरीब, झोपडपट्टीत राहणारे आहेत. स्वस्तामध्ये दारु मिळत असल्याने त्यांच्याकडून घेतली जात असल्याचे दिसते. शहरात अवैध धंदे सुरु आहेत. या धंद्यावर नियंत्रण आणावे. त्यावर कारवाईसाठी स्वतंत्र युनिट निर्माण करावे. यापुढे अशा घटना घडू नयेत, याची खबरदारी घ्यावी. अवैध धंदे, या धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat