Sunday, 23 Feb, 8.07 pm प्रभात

ठळक बातमी
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंजुमन- ए-इस्लाम लॉ कॉलेजचे नामकरण

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अंजुमन- ए-इस्लाम लॉ कॉलेजचे 'बॅरिस्टर ए. आर. अंतुले कॉलेज ऑफ लॉ' असे नामकरण करण्यात आले. यावेळी खासदार शरद पवार, माजी केंद्रीयमंत्री गुलाब नबी आझाद, गीतकार जावेद अख्तर, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार अरविंद सावंत, राज्यमंत्री आदिती तटकरे,सुनील तटकरे, माजिद मेमन,संजय राऊत आदींची उपस्थिती होती.

तसेच बॅ.अंतुले यांनी आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रांचे संकलन असलेल्या 'बनाम नर्गिस' या नीलम मुश्ताक संकलित पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top