Saturday, 06 Mar, 4.56 pm प्रभात

मुख्य बातम्या
मुलाने बापाचे नाव विचारल्यानंतर आईने केला 'धक्कादायक' खुलासा; 27 वर्षांनी नोंदवला गुन्हा

शहाजानपूर - मुलाने आपला बाप कोण? असे विचारल्याने 27 वर्षापुर्वी बलात्कार करणाऱ्यांवर महिलेने गुन्हा नोंदवला आहे. ही महिला 12 वर्षांची असताना शहाजानपूर येथे आपली बहीण आणि भावजींसह रहात असे. त्यावेळी ती घरात एकटी असताना नाकी हसन नावाच्या व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिस अधिक्षक संजय कुमार यांनी सांगितले.

या महिलेच्या तक्रारीनुसार, या आरोपीनंतर त्याचा लहान भाऊ गुड्डूही तिच्यावर बलात्कार करत होता. या दोघांनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. ज्यावेळी ती 13 वर्षांची बनली, त्यावेळी ती गर्भवती झाली. 1994 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. हे अर्भक तिचे मूळ गाव असणाऱ्या उधमपूर येथे एका परिचितांना देण्यात आले. त्यानंतर भावजींची बदली झाल्याने त्या रामपूर येथे रहायला गेल्या.

तिच्या भावजींनी तिचा विवाह गाझीपूर येथील एका व्यक्तीशी लावून दिला. मात्र तिच्या पतीला तिच्यावर बलात्कार झाला आहे हे समझल्यानंतर त्याने घटस्फोट दिला. त्यामुळे ती उधमपूरला परत आली.

दरम्यान, तिचा मुलगा मोठा झाल्यावर आपल्या आई-वडीलांचे नाव विचारू लागला. त्यावेळी आईचे नाव सांगितले आणि तो या पीडितेला भेटला. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून सदर बाझार पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून मुलाची डीएनए चाचणी घेण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. सुरवातीला ही तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. मात्र ही महिला न्यायलयात गेली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top