Dailyhunt
Mulshi Crime : मुळशी हादरलं! मतिमंद मुलीचा विनयभंग; आईस्क्रीम विक्रेत्याचा संतापजनक प्रकार

Mulshi Crime : मुळशी हादरलं! मतिमंद मुलीचा विनयभंग; आईस्क्रीम विक्रेत्याचा संतापजनक प्रकार

Mulshi Crime - मुळशी तालुक्यातील एका गावात दुचाकीवरून फिरत आइसक्रीम विक्री करणार्‍या इसमाने 14 वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ही घटना 29 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलगी आपल्या लहान चुलत बहिणीसह घराजवळ आलेल्या आईस्क्रीम विक्रेत्याकडून आईस्क्रीम घेण्यासाठी गेली होती.

यावेळी आरोपी पिंटू शिवकुमार (सध्या रा. सूस, ता. मुळशी; मूळ रा. उत्तर प्रदेश) याने मुलीला आइसक्रीम देत जवळ ओढून तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करत घराकडे धाव घेतली आणि घडलेला प्रकार पालकांना सांगितला. दरम्यान आरोपी घटनास्थळावरून दुचाकीसह पसार झाला.

संतप्त ग्रामस्थांनी परिसरात शोधमोहीम राबवून आरोपीला पकडले व त्याला पौड पोलिसांच्या ताब्यात दिले. पौड पोलिसांनी आरोपीविरोधात तातडीने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर शेख करीत आहेत.

परप्रांतीय फेरीवाल्यांची पडताळणी आवश्यक
परिसरात आइसक्रीम विक्रेते, भंगारवाले व इतर फेरीवाले मोठ्या संख्येने फिरताना दिसतात. यापैकी अनेक जण परप्रांतीय असून त्यांच्या दुचाकींवर महाराष्ट्रातील नोंदणी क्रमांक असल्याचे आढळते. अशा व्यक्तींची पोलिसांकडून सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat