Wednesday, 23 Sep, 11.29 am प्रभात

मुखपृष्ठ
मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र रचलं जातंय - संजय राऊत

मुंबई: राज्यात सध्या अभिनेत्री कंगना राणावतच्या प्रकरणावरून वाद सुरु आहे. या वादामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाव सर्वात पुढे आहे. याच मुद्द्यावर संजय राऊत यांनी बोलत असताना, कंगनाच्या प्रकरणावरून मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा सुनियोजित षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे.

कंगना राणावत प्रकरणावर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा आरोप केला आहे. याविषयी बोलताना, 'कंगनाचं कार्यालय हे बेकायदेशीर होतं. तिचं बेकायदेशीर बांधकाम तोडले म्हणून सध्या कांगावा सुरू आहे. कंगनाच्या ऑफिस तोडफोड प्रकरणात मला प्रतिवादी केलं जाणं हे हास्यास्पद आहे. सध्या मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं सुनियोजित षडयंत्र रचलं जातंय,' असा आरोप संजय राऊत यांनी केला. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर त्यांनी भाष्य केले असून ते अपेक्षितच असल्याचे म्हटले आहे.

'बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणुकासाठीच राजीनामा दिला आहे. हे सर्वांनाच अपेक्षित होते. ही त्यांची राजीनामा देण्याची पहिली वेळ नाहीये. जे लोक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत ते राजकारणात जातायत,' असे राऊत यावेळी म्हणाले. 'आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखाली घडलो आहोत. माझ्या नावावर शेकडो केसेस आहे. आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत. आम्हाला न्यायालयाची लढाई नवी नाही,' असेही ते म्हणाले.

दरम्यान, गुप्तेश्वर पांडे स्वेच्छानिवृत्ती घेतील अशी चर्चा बिहारमध्ये मागील बऱ्याच काळापासून सुरु होती. मात्र आता पांडे बक्सर विधानसभेच्या जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ-एनडीए) पांडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पांडे यांनी २००९ सालीही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पांडे हे बिहारमधील १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुशांत प्रकरणामध्ये अनेक वेळा थेट मुंबई पोलिसांच्या तपासावर पांडे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चांगलेच चर्चेत होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top