Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; दाऊदच्या हस्तकाच्या ड्रग्ज फॅक्‍टरीवर छापेमारी

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; दाऊदच्या हस्तकाच्या ड्रग्ज फॅक्‍टरीवर छापेमारी

प्रभात 5 years ago

मुंबई - दाऊदच्या हस्तकाच्या ड्रग्ज फॅक्‍टरीवर छापेमारीअभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणानंतर उघडकीस आलेल्या ड्रग्ज कनेक्‍शननंतर एनसीबीने कंबर कसली आहे. याप्रकरणी मुंबईत एनसीबीकडून ठिकठिकाणी छापेमारी करण्यात येत असून आज सकाळी केलेल्या कारवाईत मोठे यश आले आहे.

एनसीबीने दक्षिण मुंबईतील एका ड्रग्ज फॅक्‍टरीचे भांडाफोड केले आहे. या फॅक्‍टरीमध्ये मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्जचे उत्पादन केले जात होते. या फॅक्‍टरीमधून एमडी (मेफेड्रोन) बनवण्यासाठी ठेवलेला कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.

ही फॅक्‍टरी ड्रग्ज माफिया आणि गॅंगस्टर चिंकू पठाण उर्फ परवेज खानच्या साथीदाराद्वारे चालवली जात होती.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून ड्रग्जसह अग्निशस्त्र आणि मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड कोटयवधीची असल्याची माहिती सुत्रांनी दिली. एनसीबीने चिंकू पठाणला 20 जानेवारीला अटक केली. त्यानंतर ही मोठी छापेमारी करण्यात एनसीबीला यश आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat