Monday, 24 Feb, 9.11 pm प्रभात

ठळक बातमी
मुस्लीम विरोध हे भारत-अमेरिकतील नेत्यांचे मापदंड

नवी दिल्ली : मुस्लिमविरोधी जनमत हे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील नेत्यांचे मापदंड आहेत, असे ऍम्नेस्टी इंटर नॅशनलने म्हटले आहे. ऍम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया आणि ऍम्नेस्टी इंटरनॅशनल अमेरिका यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ही भावना व्यक्त करण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर येत आहेत या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही संस्थांनी हे निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. या निवेदनात ऍमनेस्टी अमेरिकाचे कार्यकारी मार्गारेट हुनांग म्हणतात, अनेक दशके दोन्ही देशांत मानवी हक्क आणि मानवी प्रतिष्ठा या मुद्यांवर मैत्रीचे संबंध होते. ती जागा आता भेदभाव, कट्टरता आणि निर्वासित आणि आश्रय मागणाऱ्यांबाबत शत्रूत्व या मुद्‌द्‌यावर येऊन पोहोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकेत केलेली प्रवेश बंदी आणि नरेंद्र मोदी यांनी आणलेला सुधारीत नागरिकत्व कायदा या दोन्ही गोष्टी एकाच मुद्‌द्‌या भोवती फिरत आहेत. तो मुद्दा म्हणजे मुस्लीम विरोध.

काश्‍मिरमध्ये गेले काही महिने असणारी इंटरनेट आणि राजकीय नेत्यांची कोठडी, का कायद्याची अंमलबजावणी आणि निदर्शने मोडण्यासाठी केलेला बळाच वापर हेच सांगत आहे की नेत्यांमध्ये सहानुभुतीचा अभाव आहे, आंतर राष्ट्रीय संस्थांसोबत आपण काम करावे, असे आवाहन आम्ही ट्रम्प आणि मोदी दोघांनाही केले आहे, असे भारतातील संस्थेचे कार्यकारी संचालक अविनाश कुमार यांनी म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top