Wednesday, 23 Sep, 9.17 pm प्रभात

ताज्या बातम्या
नागपूरमध्ये कॉंग्रेसला सुरूंग

नागपूर - नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापले असून फोडाफोडी सुरु झाली आहे. नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे महासचिव अंगद हिंदोरे यांच्यासह पूर्व नागपुरातील कॉंग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांनी हे कार्यकर्ते फोडल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. त्यामुळे यावर आता कॉंग्रेसने शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष एकत्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या समन्वय समितीने कार्यकर्ते फोडाफोडीबाबत निर्णय घ्यावा. कॉंग्रेसमध्ये पण इतर पक्षातून लोकं यायला तयार आहेत, असे म्हणत कॉंग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी फोडाफोडीवर नाराजी व्यक्त केली.

याबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जुलैमध्ये नगरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top