Wednesday, 05 Aug, 10.33 am प्रभात

ताज्या बातम्या
नगरमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त

नगर - अयोध्येत आज राम मंदिर भूमिपूजन होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मंदिर भूमिपूजनानिमित्ताने काही पक्ष व संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे, तसेच त्यांना कलम 149 नुसार नोटिसा दिल्या आहे.

या नोटिशीनुसार जल्लोष करणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. करोना संसर्गाचा धोका होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शहर पोलीस सर्तक झाले आहेत. अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन सोहळा उद्या होत आहे. त्यामुळे नगर शहरातील काही पक्ष व संघटनांनी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांना शहर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

ज्यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते, अशा लोकांना कलम 149 नुसार नोटिसा बजावून त्यांच्या जल्लोषावर निर्बंध घातले आहेत. करोना संसर्ग धोका होऊ नये, यासाठी शहर पोलिसांनी कडक पावल उचलली आहेत. शहरातील मंदिर परिसरात फिक्‍स पॉंईट दिले आहेत. त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. काही गस्तीपथके स्थापन केली आहेत.

या पथकाकडून शहरात दिवसभर गस्त सुरू राहणार आहे. तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, एसआरपीच्या तीन तुकड्या, आरसीपीच्या तीन तुकड्या, 60 होमगार्ड, असा 250 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शहरावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. सायबर पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top