Saturday, 05 Oct, 12.44 pm प्रभात

मुख्य पान
नगररचना विभागातून बल्लाळांची उचलबांगडी

नगर - महापालिकेच्या नगररचना विभागातील वादग्रस्त कनिष्ठ अभियंता के.वाय.बल्लाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना पूर्णवेळ विद्युत विभागाचा चार्ज देण्यात आला असल्याचे पत्रक उपायुक्त यांनी काढले आहे.

बांधकाम व्यावसायिकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर बल्लाळ यांच्याकडील कार्यभार काढून घेण्यात आला आहे. बल्लाळ यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून नगररचना या एकमेव विभागात ते कार्यरत होते. बल्लाळ यांना नगररचना विभागाचा कार्यभार मिळावा, यासाठी महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चाही होती.

याबाबत आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे तक्रार केली. बल्लाळ हे ठराविक बिल्डरांचीच फाईल मंजूर करतात. इतरांच्या फाईलमध्ये मुद्दामहून क्‍युरी काढतात. आमच्या फाईलवर शेरेबाजी करण्यात येते. असे गंभीर आरोप या व्यावसायिकांनी केले होते. या तक्रारीची गंभीर दखल आयुक्त भालसिंग दखल घेत नगररचना विभागातील कार्यभार काढण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top