Sunday, 25 Aug, 2.30 am प्रभात

मुख्य पान
नवरा अतिप्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट

नवी दिल्ली - घटस्फोटाचे आजपर्यंत अनेक करणे आपण ऐकली आहेत. परंतु, यूएईमध्ये एका महिलेने घटस्फोटासाठी असे एक कारण सांगितले आहे. हे ऐकून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. केवळ पती अतिप्रेम करत असल्याचे कारण देत फुजैरामधील शरिया न्यायालयात महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केले आहे.

स्थानिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, महिला पतीचे अतिप्रेम सहन करू शकत नाही. तिने म्हंटले कि, पती माझ्यावर कधीच ओरडले नाही आणि मला कधीही दुखी होऊन दिले नाही. मी एवढ्या जास्त प्रेमाने आणि स्नेहाने त्रस्त झाली आहे. तसेच घराच्या साफसफाईतही ते माझी मदत करतात. माझ्यासाठी कधी-कधी जेवणही बनवतात. एक वर्षाच्या वैवाहिक आयुष्यात एकदाही आमची भांडणे झाली नाही. ती पुढे म्हणाली, मी एकातरी भांडणासाठी तळमळत आहे. परंतु, माझ्या रोमँटिक पतीसोबत जवळपास अशक्य नाही. ते नेहमी मला माफ करतात आणि अनेक गिफ्ट देत असतात. माझा पती माझ्या सर्व आज्ञाचे पालन करतो. कोणत्याही अडचणीशिवाय असणारे जीवनच मला नको आहे. असे यूएईमधील त्या महिलेने न्यायालयाला सांगितले.

महिलेच्या पतीने म्हंटले कि, मी केवळ एक परफेक्ट नवरा बनण्याचा प्रयत्न करत होतो. तसेच पत्नीला अर्ज परत घेण्याची विनंती केली असून एका वर्षाच्या वैवाहिक आयुष्याच्या आधारावर निर्णय घेणे चुकीचे आहे. प्रत्येक माणूस चुकातून शिकतो. हे ऐकून न्यायालयानेही पती-पत्नीला आपापसात मतभेद मिटविण्यास सांगितले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top