Dailyhunt
Navjot Kaur Sidhu: पंजाब निवडणुकीपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीची नव्या पक्षाची घोषणा ; पतीच्या अनुपस्थितीत नाव जाहीर

Navjot Kaur Sidhu: पंजाब निवडणुकीपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीची नव्या पक्षाची घोषणा ; पतीच्या अनुपस्थितीत नाव जाहीर

Navjot Kaur Sidhu: पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे.

काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर नवज्योत कौर सिद्धू यांनी उचललेल्या या मोठ्या राजकीय पावलामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

डॉ. नवज्योत सिद्धू यांनी काल रात्री उशिरा त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ही घोषणा केली. त्यांनी आपल्या पक्षाचे नाव ‘भारतीय राष्ट्रीय पार्टी’ असे ठेवले आहे. Navjot Kaur Sidhu

या पोस्टमध्ये नवज्योत सिद्धू यांनी लिहिले आहे की, “त्या आपल्या पक्षाची घोषणा करण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होत्या. त्यांनी सांगितले की, त्या एका नवीन राष्ट्रीय स्तरावरील पर्यायावर काम करत आहेत आणि त्यांना आपले जीवन देशाला समर्पित करायचे आहे, म्हणूनच त्यांनी या पक्षाची घोषणा केली आहे.

‘क्षमता, आत्मविश्वास, धैर्य आणि दृढनिश्चय’ Navjot Kaur Sidhu

नवज्योत कौर सिद्धू यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत, “राजकीय नेत्यांच्या सध्याच्या कामगिरीच्या मानकांचे काळजीपूर्वक निरीक्षण आणि पुनरावलोकन केल्यानंतर, आम्ही राष्ट्रीय स्तरावर एका नवीन पर्यायावर काम करत आहोत. आम्हाला आमचे जीवन देशाला समर्पित करायचे आहे, लोकांना जे मिळायला हवे आणि त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे, ते त्यांना परत द्यायचे आहे.” असे लिहिले आहे.

तसेच पुढे त्यांनी,” देवाने काही समान विचारसरणीच्या व्यक्तींना एकत्र आणले आहे, ज्यांच्यामध्ये प्रत्येक राज्यात न्याय आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या समान ध्येयाने काम करण्याची क्षमता, आत्मविश्वास, धैर्य आणि दृढनिश्चय आहे. तसेच, वाहेगुरुजींची आपल्याकडून असलेली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, प्रेमाद्वारे उच्च चेतनेच्या ऊर्जेने कार्य करायचे आहे.” असेही म्हटले आहे.

‘आम्ही पंजाबचा हरवलेला गौरव परत मिळवून देऊ’ Navjot Kaur Sidhu:

डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी पुढे लिहिले, “आम्ही पंजाबला एक सुवर्णराज्य म्हणून त्याचा हरवलेला गौरव पुन्हा मिळवून देण्यास मदत करू, जिथे लोकांना प्रेम, वाटप, न्याय, स्वातंत्र्याचा हक्क आणि कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय आपली ध्येये, मूल्ये आणि दूरदृष्टी साध्य करण्यासाठी निस्वार्थ सेवा व आध्यात्मिक विकासाच्या उद्देशाने एकत्र काम करण्याची शक्ती यांची जाणीव असेल.

पंजाबच्या लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांकडून चालवले जाणारे सरकार. वाहेगुरुजींची भाषा असलेल्या सत्य आणि प्रेमाच्या मार्गावर चालणाऱ्या आध्यात्मिक नेत्यांच्या मदतीने लोकांच्या जखमी आत्म्यांना बरे करणे.”

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat