Saturday, 21 Sep, 1.46 am प्रभात

मुख्य पान
नेप्ती नाक्‍यावर वाहतुकीची कोंडी

नगर - नगर.मनमाड रोडवर विशेष करून नेप्ती नाका,दिल्लीगेट परिसरात आज दुपारी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. वाहतुक पोलिस येथे उपलब्ध नसल्याने अधिक गोंधळ उडाला.काही वाहनचालक व रिक्षाचालकांनी ही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. या भागात झालेल्या वाहतुक कोंडीमुळे सिव्हील हॉस्पिटल,झोपडी कॅन्टीन,प्रेमदान चौकापर्यंत वाहनांच्या रांगा काही काळ लागल्या.

नेप्ती नाका येंथें नव्याने चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.त्यामुळे शहराच्या सौदर्यांत भर पडली आहे.मात्र दिल्लीगेटकडून येणारी वाहने व आयुर्वेदीक कॉलेजकडून येणारी वाहने एकाच बाजूने जात असल्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून ये जा करताना मोठी कसरत करावी लागते.हीच जर एका बाजुची वाहतूक कर्लयाण रोडच्या दिशेने वळविली तर वाहतुकीची समस्या सुटू शकतात. पण याठिकाणी वाहनचालकांकडून जशी कोणतीही शिस्त पाळली जात नाही र्तयाचप्रमाणे वाहतुक शाखेचा पोलिस कर्मचारी पण या ठिकाणी कधीच दर्शन देत नाही.

मनमाड,औरंगाबादकडून येणारी जड वाहतूक कल्याणकडे नेप्ती नाक्‍यावरून मुंबईकडे जाते. पण या वाहनांमध्ये काय वाहतुक होते याची कुणालाही खबर नसते. कोणतेच नियंत्रण या वाहतुकीवर नाही. नेप्ती नाक्‍याच्या पुढे कल्याण रोडला आदर्शनगर,शिवाजीनगर या परिसरात मोठी नागरी वसाहत तयार होत आहे. या भागात सर्व सुशिक्षित नागरिक राहतात. मात्र या बेशिस्त अवैध वाहतुकीचा त्रास त्यांना सहन करावा लागतो. या बाबत पोलिस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top