Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
निगडीत  दहा कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू

निगडीत दहा कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू

प्रभात 5 years ago

पिंपरी - पिंपरी-चिंचवडच्या यमुनानगर परिसरात सोमवारी (दि. 25) दहा कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. शहरात पक्ष्यांच्या संशयास्पद मृत्यूचे सत्र सुरूच आहे. गेल्या 10 दिवसांत 15 पक्ष्यांचा मृत्यू झाला. आता निगडी येथील यमुनानगर परिसरात दहा कावळ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात बर्ड फ्लूच्या चर्चेला उधाण आले आहे.

यापूर्वी 10 दिवसांत 4 कावळे, पारवा व कबूतर असे एकूण 15 पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. त्या मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल अजून प्राप्त झाले नाहीत. दरम्यानच आणखी दहा कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.

या कावळ्याबाबत पशू वैद्यकीय विभागकडून अजून कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोबाइल दुपारपासून बंद असल्याने कावळ्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat