Thursday, 27 Feb, 10.45 am प्रभात

मुख्य पान
नृत्यकलेला दाद

बॉलीवूडची यंग नायिका जान्हवी कपूर ही नव्या पिढीनुसार वागणारी-बोलणारी असली तरी तिला जुन्या काळातील काही गाणीही मनापासून आवडतात. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तिने 'पाकिजा'सारखे जुने चित्रपट मला खूप आवडत असल्याचे म्हटले आहे. जान्हवी गेल्या काही महिन्यांपासून करण जोहर दिग्दर्शित 'तख्त' या चित्रपटाची तयारी करत आहे.

When u lose balance so u have to improv an over dramatic end 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on Feb 24, 2020 at 10:31pm PST

वळसे पाटील विद्यालयात शुद्धलेखन कार्यशाळा

चाकणसाठी विमानतळ हवेच - खासदार कोल्हे

नुकताच जान्हवीने एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नृत्यसराव करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. एका तासामध्ये तब्बल 5 लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या नृत्यसरावाचा फोटो पोस्ट करताना त्याखाली कॅप्शन लिहिताना जान्हवी म्हणते की, जेव्हा तुम्ही संतुलन हरवून बसता तेव्हा स्वतःमध्ये सुधारणा करत एक नाट्यमय शेवट करावा.

Can I live in a saree forever!!! ✨

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on Jan 18, 2020 at 9:11pm PST

या ओळी लिहिण्यामागचे कारण म्हणजे या व्हिडिओतील नृत्यामध्ये ती अखेरीस शरीराचे संतुलन हरवून बसते आणि एका आरशासमोर येऊन पडते ! कदाचित ही 'तख्त'मधील एखाद्या नृत्याची झलक असण्याची शक्‍यता आहे. हल्ली प्रमोशनसाठी नवनवीन फंडे कलाकार आणि दिग्दर्शक वापरत असतात. तशीच ही ट्रीक असेल तर ती यशस्वी झाली आहे हे नक्‍की !

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top