बॉलीवूडची यंग नायिका जान्हवी कपूर ही नव्या पिढीनुसार वागणारी-बोलणारी असली तरी तिला जुन्या काळातील काही गाणीही मनापासून आवडतात. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तिने 'पाकिजा'सारखे जुने चित्रपट मला खूप आवडत असल्याचे म्हटले आहे. जान्हवी गेल्या काही महिन्यांपासून करण जोहर दिग्दर्शित 'तख्त' या चित्रपटाची तयारी करत आहे.
When u lose balance so u have to improv an over dramatic end
वळसे पाटील विद्यालयात शुद्धलेखन कार्यशाळा
चाकणसाठी विमानतळ हवेच - खासदार कोल्हे
नुकताच जान्हवीने एक व्हिडियो शेअर केला आहे.
Can I live in a saree forever!!! ✨
या ओळी लिहिण्यामागचे कारण म्हणजे या व्हिडिओतील नृत्यामध्ये ती अखेरीस शरीराचे संतुलन हरवून बसते आणि एका आरशासमोर येऊन पडते ! कदाचित ही 'तख्त'मधील एखाद्या नृत्याची झलक असण्याची शक्यता आहे. हल्ली प्रमोशनसाठी नवनवीन फंडे कलाकार आणि दिग्दर्शक वापरत असतात. तशीच ही ट्रीक असेल तर ती यशस्वी झाली आहे हे नक्की !

