Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑस्ट्रेलियाचा विजय

ऑस्ट्रेलियाचा विजय

प्रभात 6 years ago

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसाने वाया गेला होता.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने सलग सातवा विजय साकार केला. 2018 सालानंतर झालेल्या 7 सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला नमविले आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इफ्तेकार अहमद आणि बाबर आझम यांनी धडाकेबाज अर्धशतके फटकावली.

मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांना वेगवान पद्धतीने धावा घेण्यात अपयश आल्याने त्यांचा डाव 6 बाद 150 धावांवर रोखला गेला. स्टिव्ह स्मिथने संघाच्या फलंदाजीची सूत्रे एकहाती सांभाळताना 51 चेंडूत नाबाद 80 धावांची खेळी केली.त्यात त्याने 11 चौकार व 1 षटकार फटकावला.

त्यालाच सामन्याचा मानकरी पुरस्कार मिळाला. ऑस्ट्रेलियाने 19 व्या षटकात 3 गडी गमावून 153 धावा करत हा सामना जिंकला.

मैदानावरच तमाशा बाबर आझम खेळत असताना समोरचे फलंदाज पाठोपाठ बाद होत होते. त्यावेळी फलंदाजीसाठी आलेल्या असीफ अली जबाबदारीने खेळेल अशी अपेक्षा आझमने केली होती, मात्र तो केवळ 5 चेंडूत 4 धावा करुन बाद झाल्याने भर मैदानावरच आझमने अलीला खडेबोल सुनावले. अलीने विनाकारण आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावल्याने आझमचा पारा चढला व त्याने संयम न राखता मैदानावरच तमाशा केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat