Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ozar News : न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Ozar News : न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

प्रभात 46 mins ago

Ozar News : शिरोली बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालया(Ozar News) मंगळवार दि २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश थोरवे, गावचे पोलीस पाटील अमोल थोरवे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी आरोग्य अधिकारी डॉ राऊत, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे, विद्यालयाचे पर्यवेक्षक गणेश राऊत सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक वृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत होते.

सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विद्येचे आराध्य दैवत (Ozar News) माता सरस्वती व गुरुदेव दत्त यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरा शिंदे या विद्यार्थीनिने केले. मन लागोरे गुरु चरणी हे ईशस्तवन पियुष शिंदे या विद्यार्थ्याने सादर केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे पर्यवेक्षक गणेश राऊत व सांस्कृतिक विभाग प्रमुख रामचंद्र अय्यर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या प्रसंगी विद्यार्थी व ग्रामस्थ यांची भाषण झाली. विद्यार्थ्यांनी पौराणिक दाखले देऊन गुरुपौर्णिमेचे महत्व सांगितले. गावचे पोलिस पाटील अमोल थोरवे यांनी सत्यावर आधारित बोधकथा व विद्यालयातील काही प्रसंग सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या.

डॉक्टर राऊत यांनी संत नामदेव यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग आपल्या मनोगतामध्ये सांगितले. विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे यांनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा याचा अर्थ गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समजावून सांगितला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (Ozar News) असलेले निलेश थोरवे यांनी आपल्या विद्यालयीन आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे मार्गदर्शन केले व या प्रसंगी त्यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयाला ५ हजार रुपये देणगी देखील दिली. आभार प्रदर्शन सिद्धी बो-हाडे या विद्यार्थिनीने केले तर सूत्रसंचालन पार्थ बोऱ्हाडे व समर्थ बोचरे या विद्यार्थ्यानी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat