Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पदव्युत्तर पदवीचे प्रथम वर्षाचे वर्ग गुरुवारपासून

पदव्युत्तर पदवीचे प्रथम वर्षाचे वर्ग गुरुवारपासून

प्रभात 5 years ago

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे वर्ग गुरुवारपासून (दि. 28) सुरू होणार आहेत. प्रथम सत्र मे महिन्यात संपल्यानंतर जून महिन्यात दुसरे सत्र सुरू होणार आहे. याबाबत विद्यापीठाने बुधवारी वेळापत्रक जाहीर केले आहे.

दि. 28 जानेवारी ते 22 मे 2021 या काळात प्रथम सत्र असणार आहे. तर, 15 जून ते 1 ऑक्‍टोबर 2021 या कालवधीत दुसरे सत्र असणार आहे. राज्य शासनाने अद्याप थेट महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे तूर्त प्रथम वर्षाचे वर्ग हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

शासनाचे आदेश आल्यानंतर थेट शिक्षण सुरू केले जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट यासह इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू आहे. ती संपल्यानंतर त्याचे प्रथम व द्वितीय सत्राचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat