Sunday, 25 Aug, 1.13 am प्रभात

ठळक बातमी
पाकच्या लष्कर प्रवक्‍त्यांनी दिला किंग खानला हा सल्ला

नवी दिल्ली : अभिनेता शाहरुख खानच्या रेडचिलीज्‌ निर्मिती बार्ड ऑफ ब्लड ही नवी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वी त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. परंतू, हा ट्रेलर पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्‍त्यांना फारसा पचला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी ट्रेलरवर टीका करत शाहरूख खानला फुकटेच सल्ले दिले आहेत.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून बार्ड ऑफ ब्लड या सीरिजच्या ट्रेलरवर भाष्य करत शाहरुखला एक विचित्र सल्ला दिला आहे. शाहरुखला भारत अधिकृत काश्‍मीरमध्ये जो अत्याचार सुरु आहे, त्या विरुद्ध आवाज उठवायला हवा. शाहरुख तुम्हाला बॉलिवूड सिंड्रोम आहे. सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी रॉ एजंट कुलभूषण जाधव, विंग कमांडर अभिनंदन आणि फेब्रुवारी या साऱ्यावर नजर फिरवा. तुम्हाला भारत अधिकृत काश्‍मीरमधील अत्याचाराविरुद्ध बोलायलाच हवं. तसंच नाझीवादाने प्रेरित झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदूत्वाच्या मुद्द्याविरोधातही बोलायला हवे.

तरचं तुम्ही शांतता आणि मानवता यांना प्रोत्साहन देऊ शकता, असे आसिफ गफूर यांनी म्हटले आहे. दरम्यान, बार्ड ऑफ ब्लड ही सीरिज लेखक बिलाल सिद्दीकी यांच्या बार्ड ऑफ ब्लड या पुस्तकावर आधारित आहे. या सीरिजमध्ये अभिनेता इम्रान हाश्‍मी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सीरिजमध्ये इम्रानने कबीर या गुप्तहेराची व्यक्तीरेखा साकारली आहे. ही सीरिज 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top